सांगली दि. १२ : शिक्षण खात्याकडे प्रलंबित असलेल्या शिक्षकांची कामे व विविध शासकीय कार्यालयाकडील पदवीधरांच्या प्रलंबित कामाचा निपटारा होण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल.शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांच्या नियमित बैठका आयोजित करुन त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयांना तातडीने कळवण्यात येईल. शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी करताना त्यांच्या प्रलंबित कामाची नोंद घेऊन त्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत. जनतेची कामे करणारा भाजपा हा एक नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे.प्रशासन मजबूत असेल तर संघटन उत्तम दर्जाचे होते आणि त्यामध्ये लोकांची कामे करण्याची यंत्रणा मजबूत होते. प्रदेशाध्यक्ष मा. रविंदजी चव्हाण यांच्या आदेशानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधर यांची प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी जिल्हानिहाय बैठका आयोजित करण्यात येत आहेत. प्रलंबित कामाची निवेदनं द्या. त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. धोरणात्मक निर्णयांच्या प्रकरणी संबधित खात्याशी प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन योग्य तो निर्णय शासन स्तरावर होईल असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंदजी चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी मा. संतोषजी साखरे यांनी सांगलीत शिक्षक व पदवीधरांच्या प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आयोजित सेवा अभियानात केले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना दौरा समन्वयक पृथ्वीराज पाटील म्हणाले, "प्रदेशाध्यक्ष मा. रविंदजी चव्हाण यांच्या आदेशानुसार मा. संतोष साखरे हे जिल्हानिहाय शिक्षक व पदवीधरांशी सेवा अभियानांतर्गत संवाद साधून त्यांच्या विविध शासकीय कार्यालयाकडील प्रलंबित कामांची निवेदने स्विकारुन त्यावर मा. रविंदजी चव्हाण यांच्या आदेशानुसार तत्काळ संबंधित खात्यांना आदेश काढणार आहेत.तसेच धोरणात्मक निर्णयाशी संबंधित कामाबाबतची शासनास योग्य ती शिफारस करणार आहेत. शिक्षक आणि पदवीधरांना दिलासा देणारा हा राज्यातील पहिलाच सेवा उपक्रम आहे. भाजपा व प्रदेशाध्यक्ष मा. रविंदजी चव्हाण यांची जागेवर जाऊन प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची भूमिका कौतुकास्पद आहे.
-------
शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी कोल्हापूरच्या बैठकीस महालक्ष्मींचा आणि सांगलीच्या बैठकीस गणेशांचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळे सेवा अभियानातून शिक्षक व पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागून निश्चितच त्यांना दिलासा मिळेल.. पृथ्वीराज पाटील
---------------------------
या सेवा अभियान संवाद बैठकीत भाजपा सांगली जिल्हा प्रभारी व खासदार धनंजय महाडिक व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्याकडे पहात पृथ्वीराज म्हणाले, ', कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. धनंजय महाडिक यांचे योगदान लक्षवेधी आहे. आता ते सांगली जिल्हा भाजपाचे प्रभारी आहेत. इथल्या स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन कवलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा' असे म्हणताच शिक्षक व पदवीधरांनी टाळ्यांचा कडकडाट करुन दाद दिली.
या सेवा अभियानात संतोष साखरे यांनी स्वतंत्रपणे शिक्षक व पदवीधरांची व त्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांकडून प्रलंबित कामे व धोरणात्मक निर्णयाशी संबंधित निवेदने स्विकारली व तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, प्रकाश बिरजे, प्रकाश ढंग, प्रशम कोल्हे, मा. राजुरवार, नीता केळकर, भारती दिगडे, शरद लाड, पृथ्वीराज पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा. एन.डी.बिरनाळे, सांगली जिल्ह्य़ातील शिक्षक, पदवीधर आणि त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.आभार शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या