प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मान्सूनपूर्व तयारी बैठकीला गैरहजर राहिलेल्या विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी छेडण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर १५ दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित विभागांकडून खुलासे मागवून आवश्यक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय,सांगली येथून १२ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, तासगाव विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठकीस गैरहजर राहिलेल्या विभागांबाबत तहसीलदारांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून त्यांचे खुलासे प्राप्त करण्यात आले आहेत.प्राप्त खुलाशांच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याबाबत विभागांना सूचना देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनकर्ते रविंद्र पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.या घडामोडीनंतर तासगाव तालुक्यात प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला तात्पुरता विराम मिळाला असला, तरी पुढील १५ दिवसांत प्रत्यक्ष कारवाई झाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या