प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : जीवनविद्या मिशन, मुंबई शाखा, मिरज उपकेंद्राच्या वतीने मिरज उपकेंद्र, बेडग येथील १० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य किर्तन व ज्ञानमहोत्सव सोहळा दि. १२ ते १५ मे २०२६ या काळात राजवाडा, बेडग येथे सायं. ६ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा थोर समाजसुधारक, तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. “प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची” हा त्यांचा संदेश या महोत्सवाचा गाभा आहे.
चार दिवसांचा कार्यक्रम असा असेल:
१. १२ मे २०२६, मंगळवार–भव्य कीर्तन सोहळा_
विषय: “सद्गुरू महिमा अगाध”
कीर्तनकार: ह.भ.प. संतोष दादा भोसले, सातारा
२. १३ मे २०२६, बुधवार– _भव्य समाज प्रबोधन सोहळा_
विषय: “सुखाचा शोध”
मार्गदर्शन: ह.भ.प. संतोष दादा भोसले, सातारा
३. १४ मे २०२६, गुरुवार– भव्य समाज प्रबोधन सोहळा_
विषय: “आनंदी जीवनाची गुरुकिल्ली”
मार्गदर्शन: मा. श्री. बन्धीधर राणे साहेब, मुंबई
४. *१५ मे २०२६, शुक्रवार* – _मार्गदर्शन सत्र_
विषय: “सुजाण पालकत्व”
मार्गदर्शन: मा. सागरदादा चव्हाण, उद्योजक, जांभळी
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी रचलेली विश्वप्रार्थना “हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे…” या प्रार्थने संपूर्ण सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
आयोजकांनी आवाहन केले आहे की, “एक दिवस नाही… संपूर्ण चारही दिवस उपस्थित राहा!” हा सोहळा स्वतःसाठी, मुलांसाठी आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे. प्रवेश विनामूल्य असून सर्वांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे निमंत्रण जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र, मिरज – उपकेंद्र बेडग, नरवाड यांच्यावतीने देण्यात आले आहे.
या सोहळ्यात श्री प्रल्हाद वामनराव पै यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या