प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार BSA (Beneficiary Satyapan App) द्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अर्थात हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अधिकृत सेवा शुल्क फक्त ₹५० निश्चित करण्यात आले आहे. तरीदेखील काही ठिकाणी एजंट व दलालांकडून नागरिकांकडून ₹७०० किंवा त्याहून अधिक रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
यामुळे नागरिकांनी अशा बोगस सेवा देणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनमान्य शुल्क फक्त ₹५० असून ही सेवा नागरिकांना स्वतःच्या मोबाईलद्वारे किंवा अधिकृत सेवा केंद्रातून उपलब्ध होत आहे.
अवाजवी पैसे मागणाऱ्या व्यक्तींविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या