प्रतिष्ठा न्यूज
सांगली : शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनिमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संजय ठिगळे यांच्या ‘कधी मनातलं कधी जनातलं ‘ या ग्रंथाचे प्रकाशन सांगली येथील रोटरी क्लबच्या गणेशनगर येथील सभागृहात शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता वारणा विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षपद जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.बी.एम.हिर्डेकर भूषवणार आहेत.
या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.एम.एस.देशमुख व मराठी अर्थशास्त्र परिषदेचे विश्वस्त प्रा. सुभाष दगडे हे उपस्थित राहणार आहेत.
तरी सदरच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समिती सदस्य भाग्यश्री पाटील-कासोटे , भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर, धर्मेंद्र पवार, राजेश ठिगळे, इंजि.ऋतुराज ठिगळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या