तासगाव : शहरातील कापूर ओढा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा तासगाव व तासगाव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवार दि.२८ मे २०२६ रोजी विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.“नदी, ओढा, जलाशय व तीर्थक्षेत्र स्वच्छता व मानसन्मान अभियान” अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून,कापूर ओढा परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या अभियानात तासगाव केंद्रातील सर्व समर्थ सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या स्वच्छता मोहिमेद्वारे “स्वच्छ ओढा, सुंदर तासगाव” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.स्वच्छता मोहिमेसाठी सहभागी नागरिकांनी खराटा,हँड ग्लोव्हज, मास्क, टोपी यांसारखे आवश्यक साहित्य सोबत आणावे, अशी सूचना देखील करण्यात आली आहे.“एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल सुरक्षित पर्यावरणाकडे” या संदेशातून तासगाव शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
“घाणीने गुदमरलेल्या कापूर ओढ्याला अखेर स्वच्छतेचा श्वास ; उद्या तासगावात महाअभियान!”
By -
मे २७, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या