प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गजेंद्र क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, गवळी गल्ली यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच दैवज्ञ भवन, गवळी गल्ली, सांगली येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सा. जी. क. असोसिएशनचे कार्यवाह श्री. नितीन (काका) शिंदे, एस. एल. पाटील सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, माजी नगरसेविका सौ. अश्याताई नितीन शिंदे, डॉ. ऋतुजा शिंदे (फिजिओथेरपिस्ट), सौ. स्वातीताई प्रमोद सूर्यवंशी, विशाल पवार, मंदार पाटणकर, गजानन काळेबेरे, योगेश गाडगीळ, विजय चोपडे, प्रसाद गवळी, गजानन गवळी, संतोषी मोरे, विजय पाताडे, पैलवान सुनील गवळी, गजानन साळुंखे, रवींद्र गोरे, कुमार जगताप, मिलिंद शिंदे, अमोल भिलावडीकर आणि विकास कामटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या बळावर उच्च ध्येय गाठण्याचे आवाहन करण्यात आले.
गजेंद्र क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व पालकांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गजेंद्र क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या