कोल्हापूर प्रतिनिधी : दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दल मध्यवर्ती समिती व जैन बोर्डिंग कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने ४६ वे नेतृत्व प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन दक्षिण भारत जैन सभेचे ट्रस्टी सुरेश रोटे, जैन बोर्डिंगचे चेअरमन विजयकुमार शेट्टी, वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील, सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांच्या हस्ते झाले.
या पाच दिवसाच्या शिबीरामध्ये मुलांचे शैक्षणिक करिअर,
आयुष्य घडवताना, टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप, व्यक्तिमत्व विकासातून नेतृत्व, शक्ती माझ्या आतच आहे, स्वतःला घडवा, समाजाला घडवा, धार्मिक शिक्षण, वीराचार्यांचे जीवन चरित्र, जीवनातील यश, निर्णय क्षमता, मी कसा घडलो, आपण वीराचार्यांना ओळखूया आणि जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग अशा विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्र घेण्यात आले.
निरोप समारंभात प्रमुख अतिथी कोल्हापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांच्याहस्ते शिबिरार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना राजू लाटकर म्हणाले की,
वीर सेवा दल नावातच सेवा आहे. आपण संघटित राहिले पाहिजे, समाजाला चांगल्या नेतृत्वाची गरज असून देशासाठी हुतात्म्यांचे बलिदान, मुनी महाराजांचे योगदान मोलाचे आहे. मोबाईल मुळे जग जवळ आले, पण माणसातली माणुसकी राहिली नाही म्हणूनच अशा संस्कार शिबिरांची गरज असून यातून नेतृत्व घडले पाहिजेत असे सांगितले.
स्वागत संयोजक प्रशांत बिरनाळे तर प्रास्ताविक पार्श्वनाथ पाटील यांनी केले. सुत्रसंचालन आर. ए. चौगुले, अनिल ऐतवडे, सुविचार परमाजे, अविराज पाटील, अमित हंजे तर संयोजन वीर सेवा दल परिवार यांनी केले.
याप्रसंगी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन संजय शेटे, महामंत्री अनिल बागणे, संघटनमंत्री शशिकांत राजोबा, अभयकुमार भागाजे, प्रकाश दानोळे, सचिन नवले, सागर चौगुले, अरविंद मजलेकर, राजू वळीवडे, श्रेणिक पाटील, रमेश पाटील, अमोल पाटील, मोहन नवले, संदिप पाटील, राकेश निल्ले, दिपक मगदूम, जयवंत कोले, आशिष देसाई, उदय ऐनापुरे, विजय खोलकुंबे, निलेश आळते, शितल कुरडे, सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या