विटा प्रतिनिधी : वसंतनगर : विटा येथे झालेल्या कुमार मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत स्नेहल स्फुर्ती क्रीडा मंडळ वसंतनगरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तर स्नेहलस्फूर्ती मंडळाच्या मुलींच्या संघाने पाचवा क्रमांक मिळवला.संपूर्ण स्पर्धेतून अष्टपैलू खेळाडू म्हणून श्री दळवी तर सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून पार्थ देवकते याची निवड करण्यात आली.
विटा येथे दिनांक २३ व २४ मे २०२६ रोजी झालेल्या कुमार व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय विटा येथे पार पडल्या. या स्पर्धेत वसंतनगरच्या स्नेहल स्फुर्ती क्रीडा मंडळाच्या कुमार संघाने एकूण सर्वच सामन्यात एकतर्फी विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून विजयाची हॅट्ट्रिक केली. जिल्ह्यातील दोन बलाढ्य संघानंतर असा पराक्रम करण्याचा बहुमान स्नेहल स्फुर्ती क्रीडा मंडळ वसंतनगरने पटकवला आहे. मंडळाच्या मुलींच्या संघानेही चांगली कामगिरी करत पाचवा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत कुमार गटातील अष्टपैलू खेळाडू म्हणून श्री दळवी तर सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून पार्थ देवकते यांना गौरवण्यात आले. स्नेहल स्फूर्ती च्या कुमार संघात पार्थ देवकते, श्री दळवी, संजय गावडे, विनायक बिरादार, बाबासो गडदे, ओम लिगाडे, अभिषेक पांढरे, अरविंद चव्हाण, वेदांत यमगर, प्रज्वल वाघामोडे, विश्वजित ओलेकर, प्रमोद माने, हर्षवर्धन केसकर, मयुरेश फोंडे, हर्षद मुंगळे, सुमित चव्हाण, विग्नेश शेजवळ, आदित्य जाधव या खेळाडूंचा सहभाग होता.
या संघांचे प्रशिक्षक म्हणून अमोल देवकते तर संघ व्यवस्थापक म्हणून सुरज लांडे यांनी काम पाहिले.
दि. ०२ ते ०५ जून २०२६ या कालावधीत सोलापूर येथे होणाऱ्या ५२ व्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पार्थ देवकते, श्री दळवी, संजय गावडे, विनायक बिरादार, व जयश्री हुडीद या ५ खेळाडूंची सांगली जिल्हा संघात निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना स्नेहल स्फुर्ती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.संपत वाघमारे सर,मंडळाचे सचिव मा.डॉ.प्रशांत इनामदार सर, राजू हाक्के, विजय माने, लक्ष्मण माने, ओंकार पुकळे, बसाप्पा कोर्ती, बाजीराव देवकते, सागर देवकते, विकास देवकते, श्रेयस देवकते, बबलू काळेल, राजू दळवी, आनंदा लिगाडे आणि सर्व सिनियर खेळाडू व कार्यकर्ते, हितचिंतक या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे परिसरातून कौतुक होत असून या यशाबद्दल खेळाडू,प्रशिक्षक,व क्रीडा मंडळातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या