प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मूलनिवासी सत्यता संघ महाराष्ट्र राज्य व संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दीडशताब्दी जयंती वर्षानिमित्त एक दिवसीय मोफत नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. “नाटक समजून घेताना : एक संवाद” या विषयावर होणाऱ्या या कार्यशाळेत नाट्यलेखन, फॉर्म्स, नाट्य इतिहास आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रख्यात नाट्यलेखक व दिग्दर्शक डॉ. अरुण मिरजकर हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मराठा सेवा संघ, सिद्धीविनायक हॉस्पिटल पाठीमागे, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेसाठी वय वर्ष १४ पेक्षा अधिक असलेल्या प्रत्येकाला सहभागी होता येणार असून सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
अरफाक शेख – 8788110062
ब्रिजेश संघमित्र – 9011747493
सूरज कांबळे – 8087820879
सचिन ठाणेकर – 9028949829
शबनम नदाफ – 8007195535
राजू कांबळे – 9604293953
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या