सांगली दि. २ : भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंदजी चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, सांगलीचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी अत्यंत विश्वासाने माझ्यावर भाजपा कोल्हापूर ग्रामीण विभागाचा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा मी कायमचा ऋणी आहे. जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील व त्यांचे सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडण्यात मला नक्कीच यश मिळणार असा आत्मविश्वास आजच्या बैठकीत मला लाभला.
२०२९मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर मधून भाजपाचे सर्व खासदार आमदार निवडून येतील असे काम करु या. भाजपाची तळागाळातील लोकांपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यासाठी कोल्हापूर ग्रामीण मधील सर्व मंडल अध्यक्ष, जिला परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीचमधील भाजपा सदस्यांनी मतदार नोंदणी अभियानात सहभागी होऊन उच्चांकी नोंदणी करावी, नोव्हेंबर/डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीचे पक्षाने दिलेले किमान उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करुन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा. पदवीधर व शिक्षक आमदार भाजपाचेच होतील यासाठी नियोजनबद्ध नोंदणी झाली पाहिजे. तसेच पदवीधर आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व कामे याबाबत त्यांची निवेदने घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपाच्या विशेष अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा. या कामी प्रदेशाध्यक्ष मा. रविंदजी चव्हाण,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः खास लक्ष घातले आहे.
असे प्रतिपादन भाजपा कोल्हापूर ग्रामीण विभागाचे प्रभारी पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी केले.
ते आज भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर येथील पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर ग्रामीण पश्चिमचे अध्यक्ष नाथाजी पाटील होते.
प्रारंभी नाथाजी पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांचा परिचय करुन सत्कार केला आणि त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे प्रयोजन सांगताना पृथ्वीराज पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. आज ही त्यांची पहिली बैठक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी पक्षाचे काम अधिक जोमाने करणार आहोत. ते यापुढे प्रत्येक तालुका व मंडलाना भेटी देणार आहेत. त्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण होणार असा मला विश्वास आहे.
यावेळी कोल्हापूर ग्रामीण मधील पक्षाचे जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य, नगरपालिका व नगरपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष यांनी परिचय करुन दिला व प्रभारी पृथ्वीराज पाटील यांनी सूचित केलेप्रमाणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणीबाबत आणि मतदार नोंदणी मॅपिंग कामाचा आढावा सादर केला. आणि पक्षाच्या आदेशानुसार ठरवलेल्या किमान उद्दिष्टापेक्षा अधिक नोंदणी करणार असे सांगितले.
या बैठकीत प्रभारींच्या सूचनेप्रमाणे उपस्थितांनी आपल्या समस्या व सूचना मांडल्या. त्याची नोंद प्रभारींनी घेतली.
या बैठकीस कोल्हापूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष नाथाजी पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, किरण घाडगे, सरचिटणीस भिकाजी जाधव, डॉ. आनंद गुरव, सुशिला पाटील, महेश चौगुले, चिटणीस दत्तात्रय मेडशिंगे, धीरज करलकर, रेखा नांगरे पाटील, तानाजी कुरणे व नामदेव कांबळे आणि सर्व १९ मंडलाचे अध्यक्ष, पाच विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका नगरपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य, पृथ्वीराजबाबा पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा. एन.डी.बिरनाळे आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या