पलूस प्रतिनिधी : अंकलखोप शिक्षण संस्थेचे शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील विद्यालय अंकलखोप येथे स्वागत कमानीचे अनावरण व महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण पलूस कडेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्वागत कमान प्रदीपआप्पा कदम यांनी स्वखर्चाने उभा केली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बापूसाहेब पाटील होते. संस्थेचे सचिव सौ. मृणालिनी पाटील उपस्थित होते. प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर मान्यवर पाहुण्यांचे सत्कार बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ रेखा घार्गे मॅडम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व
प्रदीपआप्पा कदम म्हणाले, अत्यंत सचोटीने आणि परिश्रमाने बापूसाहेब पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्ञान संपन्न व्हावेत, आयुष्यात पुढे जावेत यासाठी ही संस्था कार्यरत आहे. यांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. ध्येयवादी माणूस यशस्वी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवणे आवश्यक आहे.
यावेळी सूर्यवंशी सचिन कुराडे, महेश हजारे ,दौलत पाटील, कुलदीप वारे, अंकुश गस्ते, नंदकुमार गायकवाड, आशिष सूर्यवंशी, अभिजीत कौलगे संजय शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या