सांगली, ता. ६ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, या अमानुष कृत्याचा निषेध करण्यासाठी सांगलीत ब्राह्मण सभेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले. संशयितास कठोरात कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा सुनवावी, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले आले.
निवेदनात म्हटले आहे की, संशयित आरोपीने यापुर्वीही असे गुन्हे केले आहेत. जामिनावर असताना पुन्हा असा गुन्हा करतो यामुळे पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर सामान्य लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. गुन्ह्याचा तपास जलतगती न्यायालयात चालवण्यात येईल असे जाहीर केले आहे. त्याचे स्वागतच आहे. परंतू अशा नराधमाला फाशीच दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष, नगरेसवक केदार खाडीलकर, नगरसेवक मोहन वाटवे, भाजपच्या नेत्या नीता केळकर, विष्णू बर्वे, अरुण कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, संजय रुपलग, मंगेश ठाणेदार, रणजीत पेशकार, गौरी बर्वे, विनायक कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, विनायक कुलकर्णी ओमकार कुलकर्णी, आकाश कुलकर्णी, दत्तात्रय रेठरेकर, गोविंद कुलकर्णी, श्रेयस गाडगीळ, मनोज देवधर, पूर्वा गरग, योगेश कुलकर्णी, प्रसाद करमरकर, शैलेश केळकर, किरण कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, संजय जोशी, अमोल कुलकर्णी, महेश कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, विश्वेश फडणीस, सुभाष कपूर, मेघना नेने, अनघा कुलकर्णी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या