गगनबावडा : तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी आकर्षण ठरलेल्या गगनबावडा प्रीमियर लीग (GPL) 2026 स्पर्धेची जोरदार सुरुवात होत असून, यंदा स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. सदर स्पर्धा निवडे येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होत आहे.मा. श्री. सतेज डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रिकेटला नवे व्यासपीठ मिळत आहे.
या स्पर्धेत दहा संघ भाग घेत असून १६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, प्रत्येक संघामागे स्थानिक तरुण उद्योजक व क्रीडाप्रेमी उभे आहेत. स्पर्धेतील संघमालकांमध्ये स्वप्नील शिंदे, शिवाजी पाटील, गणेश टक्के, निखिल हासुरे, दीपक पाटील, अनिल पाटील, नंदू कांबळे, उबेद थोडगे, प्रसाद शिंदे, सचिन पडवळ व विशाल डाकवे यांचा समावेश आहे. ही स्पर्धा सहा मे ते दहा मे दरम्यान होईल.
स्पर्धेत ‘शिंदे लायन्स’, ‘किरवे बायसन्स’, ‘शिवतेज वुल्फ’, ‘निवडे टायगर्स’, ‘व्हीपी ड्रॅगन्स’, ‘आर्यन टस्कर्स’, ‘बीटी पँथर्स’, ‘लेट बीपी जग्वार्स’, ‘एसपी डिअर’ आणि ‘व्हीडी लिओपार्ड’ हे संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत.
आकर्षक बक्षिसांची रेलचेल
स्पर्धेला अधिक रंगत आणण्यासाठी आयोजकांकडून विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
🏆 प्रथम क्रमांक: रोख रक्कम ५०००० + चषक
🥈 द्वितीय क्रमांक: रोख रक्कम ३०००० + चषक
🏅 मॅन ऑफ द सिरीज
🏅 बेस्ट बॅट्समन
🏅 बेस्ट बॉलर
🏅 बेस्ट फील्डर
🏅 उदयोन्मुख खेळाडू (Emerging Player)
या लीगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळणार आहे. तसेच स्थानिक स्तरावर क्रीडाविकासाला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, गगनबावडा तालुक्यात सध्या क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या