पलूस प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथील नागरिकांसाठी यशवंत फेस्टिवल पलूस २०२६ चे आयोजन प्रदीपआप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती च्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ते सोमवार दिनांक 18 मे यादरम्यान हे फेस्टिवल होत आहे. या फेस्टिवल चे वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येणार असून बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
याविषयी माहिती देताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, पलूस येथील गुंडा दाजी लॉन कराड तासगाव रोड पलूस येथे सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे फेस्टिवल नागरिकांसाठी खुले असणार आहे. इथे खरेदीची महापर्वणी आहे. विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायसेस, इमिटेशन ज्वेलरी, आकर्षक ड्रेस मटेरियल, मोबाईल आणि सोलर उपक्रमांच्या खरेदीचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. आणि यासोबत अस्सल महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या फेस्टिवल सर्वात वैशिष्ट्य म्हणजे सर्वांसाठी 18 हुन अधिक गेम आणि राइड्स आणि मनोरंजन सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. मोफत आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन, नावडीसह फनफेअरचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. नागरिकांच्या मनोरंजनाकरिता एकापेक्षा एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तासाला एक खास लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून नागरिक आकर्षक बक्षिसे जिंकू शकणार आहेत. यामध्ये जर स्टॉल बुक करायचे असतील तर 98 22 74 23 74 तसेच 91 19 22 22 63 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
प्रदीप अप्पा कदम हे नेहमीच पलूस कडेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. नागरिकांच्या आरोग्याचे, प्रबोधनाचे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन पर कार्यशाळा, कृषी प्रदर्शन असे अनेक उपक्रम आप्पा नेहमीच राबवत असतात. या उन्हाळ्यात नागरिकांना थोडा दिलासा मिळावा याकरिता आप्पांनी प्रदीपआप्पा कदम यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पलूस फेस्टिवल चे आयोजन केले आहे. पलूस शहर आणि परिसरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि बक्षीस हे मिळणार आहेत. या संधीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या