पलूस प्रतिनिधी : पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम प्रताप शिंदे (आण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष मा. प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल ६० युनिट रक्तदान केले. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्टेडियम हॉलमध्ये सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत या शिबिर झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित पाटील (येळावी), संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले (आप्पा), उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ, संकुलातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रक्तदात्यांना आंब्याचे झाड, स्मार्ट वॉच, पाण्याची बॉटल, जेवणाचा डबा तसेच विविध उपयुक्त साहित्य भेट देण्यात आले. “एकीकडे रक्तदानातून जीवन वाचविण्याचा संदेश आणि दुसरीकडे वृक्षलागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन” असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, “धोंडीराम शिंदे यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. संस्थेमार्फत राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच गंभीर आजारांमध्ये रक्ताची गरज भासत असताना रक्तदात्यांनी केलेले रक्तदान अनेकांसाठी जीवनदायी ठरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या