पलूस प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांनी ईद-उल-अधा (बकरी ईद) निमित्त पलूस-कडेगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांना विविध ठिकाणी अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रदीप आप्पा कदम म्हणाले, ईद हा त्याग, समर्पण, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा सण आहे. त्यांनी शांतता, सौहार्द आणि ऐक्य नांदावे, अशी मी प्रार्थना करतो. “ईद-उल-अधाच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र सण समाजात बंधुभाव, प्रेम आणि आनंदाची भावना अधिक दृढ करो. हा सण आत्मसमर्पण आणि भक्तीचे प्रतीक असून, मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो.”
पलूस कडेगाव तालुक्यातील मुस्लिम समाज एकत्र येत असलेल्या अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत प्रदीप आप्पा कदम यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मुस्लिम बांधवांनी प्रदीप आप्पा कदम यांचे स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या