प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुलातील इयत्ता १० वी इंग्लिश स्कूल, सेमी इंग्लिश स्कूल तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागल्याने संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सोहळा संस्थेचे संस्थापक, माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे व संचालिका सुमनताई खाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
यावेळी सांगली महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मुस्साबानू जमादार, नगरसेवक मोहन वाटवे, प्रकाश पाटील, उज्वला कांबळे, प्राजक्ता धोतरे, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान शाखेत पूर्वा पाटील हिने ८१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी पवार (६४%) हिने द्वितीय, तर सयुज मोहिते (६२.३३%) याने तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत सिद्धी यादव हिने ९४.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. ज्ञानेश्वरी साळुंखे (९२.९३%) हिने द्वितीय, तर ज्युनेरिया शेख (८६.६७%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. इंग्लिश स्कूलमधून अनुष्का कदम हिने ९५.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अजिंक्य बनकर याने ९५ टक्के गुणांसह द्वितीय, तर अश्लेषा चौगुले व वैष्णवी होणमोरे यांनी ९३.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
सेमी इंग्लिश स्कूलमधून श्लोक पाटील याने ९७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक संपादन केला. गोविंद खोत याने ८२.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर संस्कार चव्हाण याने ७१.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या यशामागे आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे, स्वाती खाडे, रसिका खाडे मुख्याध्यापिका संगीता पाटील, करुणा माने तसेच शिक्षिका सुभद्रा जाधव, भाग्यश्री मोहिते, सायली कुलकर्णी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या