प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरज यांच्या वतीने रुग्णसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेत विजय रोकडे यांना “बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर 2025” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जनसुराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समित कदम आणि सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते रोकडे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. शिशिर डी. गोसावी तसेच संयुक्त कार्यकारी संचालक डॉ. अमिता एस. गोसावी उपस्थित होते.
विजय रोकडे यांनी आपल्या प्रामाणिक, समर्पित आणि रुग्णाभिमुख सेवेमुळे संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने हा सन्मान प्रदान केला.
या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून विजय रोकडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या