प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील तहसील कार्यालयात आमदार रोहित आर.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध शासकीय विभागांची मान्सूनपूर्व आढावा सभा पार पडली.बैठकीस तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे,पोलीस निरीक्षक विशाल टकले,तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे,उपअभियंता आकाश हुद्दार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे,मृदा व जलसंधारण, लघु सिंचन विभागांनी तलाव, पाझर तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना आ.रोहित पाटील यांनी दिल्या.कृषी विभागाने पीक पेरणीबाबत जनजागृती तसेच पावसाचा खंड पडल्यास उपाययोजनांचे नियोजन करावे,असे निर्देश देण्यात आले. बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये,यासाठी दक्षता घेण्यास सांगितले.सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा परिषद बांधकाम विभागांना रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना देण्यात आल्या.महावितरण विभागाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तर नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता व मान्सूनपूर्व तयारी सज्ज ठेवावी,असे निर्देश देण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाकडून चारा टंचाई,मका बियाणे वितरण व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.सर्व विभागांनी समन्वयाने काम करून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत,अशा सूचना आ.रोहित पाटील यांनी दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या