प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुलातील ज्युनिअर कॉलेज (विज्ञान व वाणिज्य शाखा) यांचा निकाल शंभर टक्के लागला असून संकुलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विज्ञान शाखेत पूर्वा पाटील हिने ८१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वैष्णवी पवार (६४%) हिने द्वितीय, तर सयुज मोहिते (६२.३३%) याने तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत सिद्धी यादव हिने ९४.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. ज्ञानेश्वरी साळुंखे (९२.९३%) हिने द्वितीय, तर ज्युनेरिया शेख (८६.६७%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या यशामागे माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आ. डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, सुजित खाडे, स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच शिक्षिका सुभद्रा जाधव व भाग्यश्री मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या