प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी-कराड (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सांगली येथील मा. श्री. योगेश रोकडे यांना सामाजिक क्षेत्रातील आदर्श जनसंपर्क अधिकारी म्हणून या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
माजी मुख्यमंत्री पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. योगेश रोकडे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते प्रतिष्ठा न्यूज चे सहसंपादक म्हणून कार्य करत असून MTDK शैक्षणिक संकुल मिरज येथे कार्यरत आहेत.
कार्यक्रम महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे २०२६) रोजी योजना भवन, कालनगर व्यापारी रोड, सांगली येथे संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुनील फडतरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल योगेश रोकडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या