प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : अहिल्यादेवी होळकर स्मारक, सांगली येथे आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत स्मारकाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मा. अभिमन्यू टाकले, मा. बाळासाहेब कारणावर, मा. डॉ. आर. डी. शेंडगे, माजी महापौर नितीन सावगावे, स्मारक समितीचे सचिव माननीय विष्णू माने, उद्योजक पांडुरंग रुपनर, किसन गावडे, ॲड. सिद्धेश्वर ओलेकर, संजय पाटील, बाळू खांडेकर, गणेश माने, तानाजी दुधाळ, उत्तम हराळे, पोपट सरगर, अजित खरात, अरुण कुल्लाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डी.वाय.एस.पी. पदावर निवड झाल्याबद्दल स्नेहल किसन गावडे व कोमल पाटोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी करून येथील विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी अभ्यासिकेलाही भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्मारक समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या