सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी चैन स्नॅचिंग करणाऱ्या मोका गुन्ह्यातील सराईत आरोपीस जेरबंद करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपीचे नाव
हैदरअली सरफराज कायम (वय २९), रा. इराणी इमाम बाडा, मुत्रा ता. ठाणे, जि. ठाणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
जप्त मुद्देमाल
१ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र
८० हजार रुपये किंमतीची यामाहा एमटी-५० मोटारसायकल
असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
१) सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. १३३/२०२६
२) बृहनमुंबई पोलीस ठाणे गु.र.नं. ७८७/२०२४
गुन्ह्याची हकीकत
दि. ५ मे २०२६ रोजी सकाळी अंकली रेल्वे ब्रिज परिसरात फिर्यादी महिला घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता.
या घटनेनंतर मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हैदरअली सरफराज कायम हा नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील विडुल पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून ९ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. तपासात ही मोटारसायकल मुंबईतील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीवर अनेक गुन्हे
सदर आरोपी हा मोका गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात त्याच्यावर चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी
या कारवाईत पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप नलावडे, संदीप गुरव, उदयसिंह माळी, अमिरशा फकीर, सतीश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, मोतिराम खोत, दरीचा बंडगर, मच्छिंद्र बडे, महादेव नागणे, विक्रम खोत, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील आदींनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या