सांगली, दि. २६ मे २०२६ : सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या वतीने तसेच पुरोहित चेस अकॅडमी पुरस्कृत सांगली जिल्हास्तरीय ७ व ९ वर्षांखालील मुला-मुलींच्या स्वतंत्र निवड बुद्धिबळ स्पर्धा बापट बाल शिक्षण मंदिर, शिवाजी मंडई, सांगली येथे उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन श्रेयस पुरोहित यांच्या हस्ते पटावरील चाल खेळून करण्यात आले. यावेळी चिंतामणी लिमये, दिलीप कुलकर्णी, प्रदीप निकम व राजू सोनेचा उपस्थित होते.
७ वर्षांखालील गटाचे निकाल
७ वर्षांखालील मुलांच्या गटात सांगली, इस्लामपूर आदी भागातील ७ मुले व ३ मुलींनी सहभाग घेतला. तिसऱ्या फेरीनंतरचे निकाल पुढीलप्रमाणे –
मुलांचा गट :
प्रथम – आरव पाटील (३ गुण)
द्वितीय – रूहान आत्तार (२ गुण)
तृतीय – वेदास चौगुले (२ गुण)
मुलींचा गट :
प्रथम – सान्वी कुलकर्णी (२ गुण)
द्वितीय – राजनंदिनी भिसे (१ गुण)
तृतीय – मृदुला पाटील (१ गुण)
९ वर्षांखालील गटाचे निकाल
९ वर्षांखालील गटात सांगली, ईश्वरपूर, भिलवडी, नागराळे आदी भागातील १४ मुले व ४ मुलींनी सहभाग घेतला. या गटात चार फेऱ्या घेण्यात आल्या.
मुलांचा गट :
प्रथम – अनिरुद्ध साळुंखे, भिलवडी (४ गुण)
द्वितीय – केशव कौशिक, सांगली (३ गुण)
तृतीय – आयुष लोंढे, सांगली (३ गुण)
मुलींचा गट :
प्रथम – परी पाटील, नागराळे (१.५ गुण)
द्वितीय – संस्कृती कुबडगे, सांगली (१.५ गुण)
तृतीय – स्वरांजली पाटील, सांगली (१ गुण)
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ५०० रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी ३०० रुपये व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण महाराष्ट्र चेस असोसिएशन व सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रेयस पुरोहित, चिंतामणी लिमये, राजू सोनेचा, दिलीप कुलकर्णी व प्रदीप निकम उपस्थित होते.
७ वर्षांखालील गटातील प्रथम दोन मुले व मुली पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी, तर ९ वर्षांखालील गटातील प्रथम दोन मुले व मुली संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेचे पंच म्हणून फिडे पंच दिपक वायचळ व मोहिनीराज डांगे यांनी काम पाहिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या