प्रतिष्ठा न्यूज
हातकणंगले प्रतिनिधी : तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अश्लील व्हिडिओ बनवत अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक अमित पांडे यांची भेट घेवून केली.
शिरोली पुलाची येथील शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई यांनी तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात उडून त्यांचे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर तसेच जिहादी मनोवृत्तीच्या नराधमांकडून झालेल्या हिंदू मुलींच्या लैंगिक शोषणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे त्यामुळे अशा प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा एसआयटी कडून सखोल तपास व्हावा व दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी ही मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व रवींद्र माने यांनी सदरचे प्रकरण ताजे असतानाच काहींनी हिंदुत्ववादी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पिस्तूल रोखून या प्रकरणात पुढाकार घेऊ नका असे धमकावण्यात आले होते. या संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हे नोंद करावेत असे सांगितले. या संवेदनक्षम प्रकरणात समाजात शांतता टिकून ठेवण्याची आवाहन केले.
यावेळी शिरोलीचे शहर प्रमुख प्रमोद पाटील, उपशहर प्रमुख राजेंद्र पाटील, शिवसेना सरचिटणीस शिरोली दत्ता भोसले, युवासेना उपजिल्हा प्रमुख विनायक यादव, युवा सेना शहरप्रमुख ओंकार रंगापूरे,बाळासाहेब नरसवडे, शशिकांत तराळ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या