प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहर हद्दीतून वाहणाऱ्या कापूर ओढ्याची स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने तासगाव नगरपरिषद, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा तासगाव तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कापूर ओढा परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक आरोग्य आणि शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. नागरिकांनीही स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारत नगरपरिषदेच्या उपक्रमाला सक्रिय साथ दिली.या मोहिमेत नगराध्यक्षा सौ.विजया बाबासो पाटील यांनी विशेष पुढाकार घेत नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.उपनगराध्यक्ष प्रसाद भारत पैलवान,आरोग्य सभापती सौ.संध्या संजय लुगडे, मुख्याधिकारी सुधाकर सुकदेव लेंडवे, गटनेते नगरसेवक सतिश किसन लिंबळे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्था, मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्वच्छ तासगाव, सुंदर तासगाव” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भविष्यातही लोकसहभागातून अशा विविध स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या