वारणानगर प्रतिनिधी : आज दि 17 मे रोजी पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातील आमदार विनय कोरे यांची संघर्ष समिती समन्वयक गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भेट घेत चर्चा केली. यावेळी *आ. विनय कोरे म्हणाले, "पर्यायी उपलब्ध रस्ते असताना अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या पिकाऊ शेतजमिनी घेऊन महामार्ग करणे या धोरणाशी मी सहमत नाही.शेतकऱ्यांची ही भूमिका सरकारपर्यंत पोहोचवू.तज्ज्ञांशी चर्चा करून या महामार्गास पर्याय सरकारला सुचवू व कायदेशीर सल्ला देखील घेऊ.या प्रश्नी शेतकऱ्यांच्या भूमिकेशी सहमत असून शेतकऱ्यांसोबत आहे.19 मे रोजी मुंबईला असल्याने मी मेळाव्याला जरी गैरहजर राहिलो तरी माझे प्रतिनिधी व कार्यकर्ते पाठवेन"
यावेळी गिरीश फोंडे, नितीन हुजरे, राजेंद्र जाधव, दीपक जाधव, शिवाजी सिद, राहुल जाधव, किरण पाटील,मच्छिंद्र जाधव, मिलिंद जाधव, पिंटू भोसले यांच्यासह पारगाव बहिरवाडी, जाखलेतील शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या