प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : दहावी नंतरची विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे पाच वर्षे महत्वाची असून विद्यार्थ्यांनी मनापासून कष्ट करण्याची गरज आहे अन्यथा आयुष्य खडतर होइल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रामानंदनगर येथे पक्ष कार्यालयात दहावीच्या यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रदीपआप्पा कदम बोलत होते.
प्रदीप आप्पा कदम म्हणाले, यावर्षी इन कॅमेरा परिक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आहे. कोणतही आरक्षण नसताना मुलींनी आपल्या बुद्धीच्या बळावर शिक्षणात कर्तृत्व सिद्ध केले आहे. हा आदर्श मुलांनी घेतला पाहिजे. दहावी नंतरची पाच वर्षे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. पाच वर्षे कष्ट करा आणि सुखी आयुष्याचा पाया मजबूत करा. नाहीतर आयुष्यभर अतोनात कष्ट सहन करावे लागतील. खडतर प्रवास होईल. पालक आपल्यासाठी कष्ट करतात त्यांची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे आवाहन प्रदीपआप्पा कदम यांनी केले.
यावेळी तुकाराम धायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव, अमीर भैय्या पठाण, शामराव कुंभार, जमीर पठाण, नाबाद नदाफ, राहूल इंगवले, मंजीरी शिंदे, सरिता कुंभार, सचिन कु-हाडे, दौलत पाटील, विखे पाटील कृषी परिषदेचे विभागीय अध्यक्ष संजयकुमार शिंदे यांच्यासह पालक व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या