प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत किर्लोस्कर हायस्कूलची विद्यार्थिनी शरयू विश्रांती बाजीराव पाटील हिने शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे किर्लोस्कर हायस्कूलसह संपूर्ण किर्लोस्करवाडी परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.अत्यंत मेहनत,सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे अचूक नियोजन आणि प्रबळ आत्मविश्वास यांच्या जोरावर शरयूने हे नेत्रदीपक यश मिळवले. सर्व विषयांत उत्कृष्ट गुण मिळवत तिने शाळेच्या गुणवत्तेच्या परंपरेत मानाचा तुरा खोवला आहे.
“यशासाठी जिद्द, चिकाटी आणि समर्पण आवश्यक असते,” हे शरयूने आपल्या निकालातून सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शिक्षक, पालक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शरयूच्या यशामागे तिच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळेच तिने हे उज्ज्वल यश मिळवल्याची भावना व्यक्त होत आहे.तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातही ती शिक्षण क्षेत्रात अशीच यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मार्गदर्शक शिक्षक :
अभय बिराज, रंजीत यादव, रजबीर सिंघ, बेला साठे, मयूर गीते, वैशाली आवटे, उमेश बेनके आणि ओम वाकूडकर यांनी शरयूला मोलाचे मार्गदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या