प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई गणपतराव कोळी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आज तासगाव येथे विविध प्रेरणादायी कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला.वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या या शताब्दी वर्षाचा समारोप स्वातंत्र्यसैनिक स्तंभाला अभिवादन करून करण्यात आला.तासगाव येथील जुन्या तहसील कार्यालया समोरील स्वातंत्र्यसैनिक स्तंभावर उपस्थित मान्यवरांनी अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे भाई गणपतराव कोळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या वेळी लोकमतचे संपादक वसंत भोसले प्रमुख उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात भाई गणपतराव कोळी यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, “आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सारखा प्रामाणिक,तत्त्वनिष्ठ आणि जनतेसाठी झटणारा नेता होऊन गेला,ही गोष्ट आजच्या तरुणांना अविश्वसनीय वाटू शकते.” त्यांनी सांगली जिल्ह्याचा जाज्वल्य इतिहास हळूहळू पुसला जात असल्याची खंत व्यक्त करत,अशा महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र नव्या पिढीसमोर आणण्याची गरज अधोरेखित केली.प्रा.विजय कोगनोळे यांनी भाई गणपतराव कोळी यांच्या साध्या जीवनशैलीचा दाखला देताना त्यांच्या घरबांधणीचा किस्सा सांगितला.लोकवर्गणीतून स्वतःचे छोटेसे घर उभारणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आमदार असावेत,असे त्यांनी नमूद केले.तसेच प्रा.डॉ.बाबुराव गुरव यांनी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देत,स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित केली.या कार्यक्रमास तासगाव नगरपालिकेच्या सदस्या सौ.ज्योती कोळी,सौ.देवयानी कोळी यांच्यासह सुधाकर कोळी,सचिन कोळी,बाबुराव जाधव,तुषार कोळी, बाबु अण्णा थोरात,भरत थोरात, गणेश शिरतोडे,भीमराव भंडारे, अर्जुन थोरात,सुधीर नलवडे,विशाल खाडे,प्रा.संजय वावरे,विशाल माने, दत्तात्रय बामणे, कुंभार सर,शाम माळी,सचिन पाटील, प्रा.राजेश रोमन, एम. एच.पाटील,संतोष कोळी, मुबारक मणेर, जगन्नाथ शेवाळे, शशिकांत डांगे, चंद्रकांत माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
विशेष म्हणजे, भाई गणपतराव कोळी यांना अखेरपर्यंत साथ देणारे प्रकाश देवकुळे व संतोष कोळी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजन प्रा. वासुदेव गुरव व अमर खोत यांनी केले,तर शरद शेळके यांनी आभार प्रदर्शन केले.एकंदरीत,या समारोप सोहळ्याने भाई गणपतराव कोळी यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला असून, त्यांच्या विचारांचा दीप पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या