गगनबावडा : राज्यातील विकासापासून दूर राहिलेल्या तालुक्यांचा दर्जा सुधारण्यासाठी 'नीती आयोगा'ने विशेष पुढाकार घेतला असून, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी १७७ तालुके आजही मागास असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले असून, या यादीत जिल्ह्यातील केवळ गगनबावड्याचा समावेश आहे.
विकासाचा नवा आराखडा: या १७७ तालुक्यांना प्रगत शहरांच्या पातळीवर आणण्यासाठी नीती आयोगाने एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे. यासाठी स्वतंत्र योजना राबवली जाणार असून, राज्याचा नियोजन विभाग यावर थेट देखरेख ठेवणार आहे.
राज्यातील ५० टक्के तालुके अद्यापही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत पिछाडीवर आहेत. गगनबावडा तालुक्याचे भौगोलिक स्थान आणि तेथील विकासाची गरज लक्षात घेता, त्याला या विशेष कार्यक्रमात स्थान मिळाले आहे.
आगामी काही वर्षांत या तालुक्याचा विकास अशा पद्धतीने केला जाईल की, तेथील सुविधा प्रगत शहरांच्या बरोबरीने असतील.
या विशेष योजनेअंतर्गत गगनबावडा तालुक्यात रस्ते, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल. दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या या तालुक्यासाठी हा विकास आराखडा एक 'गेम चेंजर' ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या