तासगाव प्रतिनिधी : साने गुरुजी नाट्यगृहात 2025-26 चे गुणवंत शिक्षक पुरस्कार व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण समारंभामध्ये सभापती अरुणाताई पाटील बोलत होत्या.
तासगाव तालुक्यातील विद्यार्थी स्कॉलरशिप व विविध स्पर्धांच्या मध्ये राज्यात आणि विभागांमध्ये मोठ्या संख्येने येण्यासाठी तासगाव तालुका पंचायत समिती कार्यरत राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
पंचायत समिती सदस्य व माजी समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद सांगली प्रमोद आप्पा शेंडगे यांनी मॉडेल स्कूलची आवश्यकता,पायाभूत सुविधा, तत्कालीन सीईओ जितेंद्र डुडी यांनी केलेली प्रयत्न,शिक्षण क्षेत्रातील विविध रिक्त पदे या मुद्द्यांचा परामर्श घेत चांगल्या शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य अमितदादा विजयराव पाटील यांनी पटसंख्येवर ताकतीने काम करण्यावर भर देत माजी सभापती चंद्रकांत बापूंचा अनुभव सांगत तत्कालीन पंचायत समिती सदस्यांनी भत्त्याची रक्कम स्पर्धापरीक्षा साहित्य खरेदीसाठी खर्च केल्याच्या आठवणी सांगितल्या. पंचायत समिती उपसभापती सुखदेव आबा पाटील यांनी तासगाव तालुका पंचायत समिती राज्यात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल व यासाठी शिक्षकांना आवश्यक ती मदत करू असे सांगितले.
दीपप्रज्वलन,प्रतिमापूजन व वटवृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी शैक्षणिक कामकाज,गुणवत्ता, तासगावचा शैक्षणिक वारसा, मुलींच्या शिक्षणाची सुरुवात शिक्षकाची समाजातील स्थान व योगदान शिक्षकांच्या बद्दल अपेक्षा त्याचबरोबर भारतातील दुसऱ्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
यावेळी उपस्थित योजना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी तासगावच्या गटशिक्षणाधिकारी कार्यकालातील अनुभव सांगत पदाधिकारी,अधिकारी व शिक्षक यांच्यातील नात्यामुळे व संवादामुळे यश मिळते व शैक्षणिक योजनांना पदाधिकाऱ्यांमुळे वेग प्राप्त होतो असे सांगितले.
तासगावच्या नगराध्यक्षा विजयाताई बाबासाहेब पाटील यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील योगदान महत्त्वाचे असून सर्व पदाधिकारी,अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असल्याचे सांगत तासगाव नगरपालिका शाळा विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे यांनी शिक्षक हे मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम करतात,इतर सर्व शाळांना इमारती मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागाबाबत प्रश्न उपस्थित करून मार्गी लावू असे सांगितले.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य अविराज उर्फ अक्षयभैया पाटील,पंचायत समिती सदस्य सुनीलभाऊ जाधव,महेशदादा पाटील,विद्याराणी चव्हाण, बालिका माने, कल्पनाकाकी पाटील,संगिताताई लांडगे,ऋषिकेश बिरणे,तासगाव उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान उपस्थित होते.
शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, समिती तालुका अध्यक्ष महादेव जंगम, सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदकुमार खराडे व शोभा माने यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी शंकर पवार यांनी मानले.सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य केंद्रप्रमुख,पालक,बी आर सी स्टाफ व तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या