सांगली | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण होत असून, या पार्श्वभूमीवर कुलदीप देवकुळे यांची शिवसेना शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हा (पश्चिम महाराष्ट्र विभाग) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच शिवसेना सचिव संजयजी मोरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
कुलदीप देवकुळे यांना नियुक्तीचे पत्र डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभा माढा संपर्कप्रमुख पैलवान चंद्रहार दादा पाटील तसेच शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रहार दादा पाटील आणि संजय बापू विभुते यांनी सांगितले की, शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यात येणार आहे. “गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक” या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार सेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिव उद्योग सहकार सेना प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी आपल्या संदेशात विश्वास व्यक्त करताना म्हटले की, कुलदीप देवकुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक सक्षम करतील.
तसेच सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिव उद्योग सहकार सेना प्रभावीपणे पुढाकार घेईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. सहकार क्षेत्रातील अडचणी, शेतकरी व कामगारांशी निगडित प्रश्न, तसेच स्थानिक पातळीवरील विकासाच्या मुद्द्यांवर संघटनेच्या माध्यमातून ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
कुलदीप देवकुळे यांच्या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यात शिवसेना व शिव उद्योग सहकार सेनेच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या