प्रतिष्ठा न्यूज
अमरावती/मुंबई, दि. २३ : सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली *दि. २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही १००% यशस्वी झाला* असून, राज्यभरातील मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंतचे *संपूर्ण शासकीय कामकाज ठप्प झाले* असल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक *श्री. डी. एस. पवार* यांनी दिली.
*जुन्या पेन्शन योजनेसह १८ प्रलंबित मागण्यांसाठी* हा संप सुरू असून, कर्मचारी तेवढ्याच ताकदीने व एकजुटीने संपात सहभागी आहेत. *आरोग्य, वन, सार्वजनिक बांधकाम, जीएसटी, समाज कल्याण, फॉरेन्सिक लॅब, आदिवासी विकास, आरटीओ, लेखा व कोषागार, शिक्षण, तंत्रशिक्षण* सह *जेलचे कर्मचारीही* संपात उतरल्याने प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे.
*प्रमुख मागण्या :*
१) *जुन्या पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना स्पष्टीकरणात्मक अधिसूचनेसह तात्काळ लागू करावी.*
२) *सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करावे.*
३) *रिक्त पदांची तात्काळ भरती करावी.*
४) *मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर दर २ महिन्यांनी कर्मचारी संघटनांसोबत चर्चासत्र आयोजित करावे.*
५) *लिपिक वर्गीय, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत.*
६) *कलम ३५३ अजामीनपात्र करावे, PFRDA कायदा रद्द करावा, नवीन शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करावा.*
७) *केंद्राप्रमाणे आठवा वेतन आयोग लागू करावा.*
*श्री. पवार म्हणाले,* "बटेंगे तो कटेंगे हे ध्यानात घेऊन कर्मचाऱ्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली. या शूर सरदारांचे आम्ही अभिनंदन करतो. *शासनाने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. ठोस निर्णय न घेतल्यास जनगणना व निवडणूक कामांवर बहिष्कार टाकून आंदोलन अधिक तीव्र करू.*"
*दि. २२/०४/२०२६ रोजी* मुख्य सचिव मा. राजेश अग्रवाल यांच्यासोबत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची *मॅरेथॉन बैठक* झाली. बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, परंतु *सुकाणू समितीचे समाधान झाले नाही.*
*"मा. मुख्यमंत्री महोदयांकडून मागण्यांबाबत लेखी संमती येत नाही तोपर्यंत समन्वय समिती संपावर ठाम आहे,"* असे पवार यांनी स्पष्ट केले.
*दि. २३/०४/२०२६ रोजी* झालेल्या चर्चेचा *कार्यवृत्तांत मा. मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून संघटनेला देण्याचे मान्य केले आहे.* कार्यवृत्तांत मिळाल्यानंतर *सुकाणू समितीची तातडीची बैठक घेऊन* एकमताने संपाची पुढील दिशा ठरवली जाईल.
*"हम सब एक है!"*
*कर्मचारी एकजुटीचा विजय असो!*
*डी. एस. पवार*
*निमंत्रक*
*सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र*
*मो. ९४२३६२१६४२*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या