तासगाव :संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील आणि प्राध्यापिका डॉ. एल. व्ही. भंडारे यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवागौरव सत्कार समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. “एक यशस्वी प्रवास… आता नव्या वाटा” असा प्रेरणादायी संदेश देत अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सन्मानित शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजय भगवान साळी उपस्थित होते. प्रारंभी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे व डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बी.एड. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. या गीताला कु. वैष्णवी मोरे आणि प्रा. खजूरकर यांनी संगीत साथ दिली.यावेळी डॉ. बी. एम. पाटील आणि डॉ. लक्ष्मी भंडारे यांच्या शैक्षणिक कार्याचा मागोवा घेणाऱ्या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन तसेच त्यांच्या कार्यावर आधारित ‘स्नेहकुंज सेवागौरव विशेषांक’ मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि विविध मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमात कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हजारे, विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सांगली विभाग प्रमुख प्राचार्य हाके, आजीव सेवक बेडगे, ज्येष्ठ विचारवंत बाबुराव गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन डॉ. पाटील व डॉ. भंडारे या दाम्पत्याचा सपत्नीक गौरव करण्यात आला.यावेळी त्यांच्याविषयीचे मानपत्र वाचन प्रा. प्रमोद शेंडगे आणि डॉ. अर्चना चिखलीकर यांनी केले. आजी-माजी प्रशिक्षणार्थी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने आपल्या मनोगतातून दोघांच्या कार्याचा गौरव करत भावनांना वाट मोकळी करून दिली.आपल्या मनोगतात डॉ. एल. व्ही. भंडारे यांनी सेवाकाळातील अनुभव मांडताना संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर डॉ. बी. एम. पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते व्यक्त केले.प्रमुख पाहुणे डॉ. अजय साळी आणि अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या भाषणातून सन्मानित शिक्षकांचे योगदान अधोरेखित करत विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवला. “शिक्षक निवृत्त होतो, पण त्याचे संस्कार कधीच निवृत्त होत नाहीत,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. देवदत्त खजूरकर, डॉ. अर्चना चिखलीकर, प्रा. अंकुश पंडित, प्रा. प्रमोद शेंडगे, तसेच प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी निकम आणि सारिका पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. देवदत्त खजूरकर, तर आभार प्रदर्शन डॉ. रत्नाकर म्हस्के यांनी केले. शेवटी **‘वंदे मातरम्’**ने कार्यक्रमाची सांगता झाली.
“सेवेचा सुवर्णअध्याय पूर्ण; नव्या वाटांचा प्रेरणादायी संदेश”; प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील आणि प्राध्यापिका डॉ. एल. व्ही. भंडारे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम
By -
एप्रिल २३, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या