मजले : येथील श्री नरसिंह मंदिरात यंदापासून (२०२६) नरसिंह जयंतीनिमित्त भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेची सुरुवात गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता नदीचे पाणी वाजत-गाजत आणून होणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा व भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. १ मे रोजी सकाळी ९.०० वाजता डॉ. वर्षा अविनाश सावर्डेकर यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी १०.०० वाजता फनी गेम्स व रंगोळी स्पर्धा होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच लिंबू-चमचा, संगीत खुर्ची व स्लो सायकल स्पर्धा (मुले व मुलींसाठी) आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
याच दिवशी रात्री ९.०० वाजता प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांवर आधारित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
शनिवार, दि. २ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ खेळ व पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री नरसिंह मंदिर, मजले येथे करण्यात आले असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या