प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर तालुका जत येथे दिनांक 20/04/2026 वार सोमवार या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मनिषा पाटील मॅडम व उपसरपंच अल्का पांढरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच आण्णासो विलास पांढरे साहेब यांनी अध्यक्ष स्थान स्विकारले होते.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राम पाटील, जिरग्याळ केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय जगताप साहेब, युवा नेते धनाजी हजारे, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो पांढरे इनामदार ,माजी सरपंच आबा पांढरे ,गावचे पोलीस पाटील प्रभू कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अजित पांढरे ,माजी उपसरपंच संदीप पाटील ,आदर्श शिक्षक आर बी पांढरे सर ग्रामपंचायत सदस्य अजितराव पांढरे, मुख्याध्यापक शिंदे सर वकील पंच , शहाजी कोंडीगिरे सर व सर्व ग्रामपंचायत सदस्य शिंगणापूर तसेच ग्रामस्थ व पालक यावेळी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या नृत्यकला ,नाट्यकला व विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सराव घेऊन तयारी करून घेतली.
समाज प्रबोधन व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध कलागुण सादर करून समाजाला विद्यार्थ्यांनी संदेश दिला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लोककला नृत्य विविध गीतावर नृत्य करून प्रेक्षकांचे मन जिंकली व त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी बचत गटाच्या साहेब जयश्री कोंडीगिरे मॅडम व राधिका कोंडीगिरे मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले.
पालक वर्ग गावकरी व समाजातील विविध व्यक्ती यांनी विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाची तयारी करून घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, नखाते सर, काळे सर, चौरे सर ,सपकाळ सर व पाटील सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून प्रकारचे नियोजन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या