प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : “आरोग्याचा वसा, मनमुराद हसा” या संदेशासह जागतिक हास्य दिनानिमित्त सांगलीत हास्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हास्ययोगातून आरोग्य, आनंद आणि विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्व हास्यप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा मेळावा गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजता खरे मंगल कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे होणार आहे. कार्यक्रमात विविध हास्य फेऱ्या, नाश्ता, तसेच हास्य क्लब सदस्यांचा सत्कार आणि विविध गटांचे हास्य सादरीकरण असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाला सांगली मिरज कुपवाड शहर महानगर पालिका आयुक्त संजीता मोहपात्रा, ऍड. विलासराव पवार, अनुजा ताई पाटील, श्रीरंग केळकर, जया जोशी, मदनलाल ओसवाल आणि सतीश येडूरकर यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हास्ययोगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत समाजात सकारात्मकता वाढविण्याचा उद्देश या मेळाव्यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या