प्रतिष्ठा न्यूज
हुपरी दि.२२ :उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण मावळतीला जाणारा सूर्य एके काळी तळपला म्हणून पाऊस पडला व धान्य पिकलं आणि माणसं जगली हे विसरता कामा नये. आई - वडील हे सूर्य चंद्र आहेत. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून कुटुंब जगलं. त्यांचे उपकार विसरु नका. त्यांचा आदर करा.. सेवा करा.. त्यांचा सल्ला घ्या.. त्यांचा अपमान करु नका.. नव्या पिढीवर हे संस्कार झाले पाहिजेत. रस्ते डांबरी झाले पण त्यावर चालणारे डांबरट झाले. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत आहे. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे ग्रामीण भागातील आजी-आजोबा नातवंडांसाठी तरसू लागली. फ्लॅट मधील लेकरांना आजी - आजोबांचे संस्कार मिळणं कमी झालं. घर कुटुंब टिकायचे असेल तर जेष्ठ नागरिक घरातच हवेत आपल्या घरातील जेष्ठ नागरिकांचा आदर सन्मान करा असे प्रतिपादन वाणीभूषण प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. दिड तास त्यांनी जेष्ठ नागरिक महत्त्व, नव्या पिढीवर संस्कार, आई वडील महत्व या विषयावर सर्वांना पिन ड्राॅप सायलेन्स मध्ये मंत्रमुग्ध केले. ते हुपरी येथे श्री पैसाफंड सह. प्रकिया संघाच्या सभागृहात जेष्ठ नागरिक संघ हुपरी व श्रीमती निलावती शेटे चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थांनी संघाचे अध्यक्ष मा. सुरेश शांताप्पा इंग्रोळे होते.
प्रारंभी तिरुपती बालाजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या व एप्रिल मध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.मा. सुरेश इंग्रोळे व सौ. जयश्री इंग्रोळे यांचे संशोधक पुत्र डॉ. रोहन, ज्यांनी अमेरिकेत इंजेक्शन विरहित लसीकरणाचा जगातील पहिला प्रयोग यशस्वी करुन हुपरीला जगाच्या नकाशावर झळकवले त्यांनी अमेरिकेत छ. शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्याचा उल्लेख केला तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडील स्व. नेमिनाथ शेटे यांच्या संस्कार व आई श्रीमती निलावती यांच्या कडक शिस्तीने चांदी उद्योजक म्हणून मा. राजेंद्र शेटे यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचा उल्लेख करताच टाळ्यांचा झालेला कडकडाट लक्षवेधी होता.
कार्यक्रमात स्वागत प्रास्ताविक सुरेश इंग्रोळे, पाहुणे परिचय आर. व्ही. पाटील तर सूत्रसंचालन नानासाहेब भोसले यांनी केले. आभार आप्पासाहेब देसाई यांनी मानले.
कार्यक्रमास अध्यक्ष सुरेश इंग्रोळे, सौ. जयश्री इंग्रोळे, उपाध्यक्ष गणपतराव ढोणुक्षे, सचिव नानासाहेब भोसले, खजिनदार यशवंत वसवाडे,श्रीमती निलावती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती निलावती नेमिनाथ शेटे, सचिव सौ. नंदा सुनिल शेटे इचलकरंजी, जेष्ठ नागरिक संघाचे संचालक सर्वश्री आप्पासाहेब देसाई, सदाशिव वाईंगडे, लगमाण्णा पट्टणकुडे, सुरेश पतंगे, रावसाहेब शि.पाटील, अनंत माताडे, रावसाहेब वि. पाटील, भालचंद्र सप्तसागरे, रामचंद्र खांडेकर जयसिंग चिटणीस, मोहन वाईंगडे आणि जेष्ठ नागरिक संघ, शेटे चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य, जेष्ठ नागरिक आणि हुपरीकर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अत्यंत सचोटीने चांदी व्यवसाय करुन सामाजिक कामाला मदत करणारे राजेश सिल्व्हर प्रा. लि., हुपरीचे राजेंद्र शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी वाणीभूषण प्रा. एन.डी.बिरनाळे यांचा आचार - विचार व यशस्वी कामगिरी बद्दल सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या