सांगली | दि. ११ : स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचे अग्रदूत, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथील आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या, शिक्षण प्रसाराच्या आणि शोषित-वंचितांच्या उन्नतीसाठी केलेल्या महान कार्याचा गौरव केला. "महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली असून, आजही सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचे विचार तितकेच मार्गदर्शक व महत्त्वाचे आहेत," असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समाजात समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची पायाभरणी अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
शिक्षण आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मंडल अध्यक्ष राहुल नवलाई, ग्रामपंचायत सदस्य गणपत साळुंखे, देवधर सांगले, संजय कांबळे, चंदन सनदी, अभिषेक कांबळे, गजानन नलवडे, गौस पठाण, अर्जुन मजले, स्नेहजाताई जगताप, अश्विनीताई तारळेकर, आम्रपालीताई कांबळे, भालचंद्र बक्षी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या