पुणे प्रतिनिधी : शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारा विषय आहे . शारीरिक व मानसिक सुदृढतेच्या माध्यमातून सक्षम समाज निर्मिती, बलशाली राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीमध्ये या विषयाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून ऑलिम्पिंक पदकाचा पाया रचला जात आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये या विषयाच्या अध्यापनाचे काम करणारे शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्यात गेल्या वीस वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदभरतीला शासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर आजही बेरोजगार आहेत. या दीर्घकालीन अन्यायाविरोधात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने अखेर थेट लढाईचा बिगुल फुंकला असून सोमवार दि. 27 एप्रिल 2026 रोजी पासून आझाद मैदान मंत्रालय मुंबई या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे.
सोमवार दि. 27 एप्रिल 2026 पासून आझाद मैदान मंत्रालय, मुंबई या ठिकाणी बेमुदत मुदत धरणे आंदोलन करीत आहोत.
या बेमुदत धरणे आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शारीरिक शिक्षक शिक्षक सहभागी होणार आहेत. हे बेमुदत धरणे आंदोलन पूर्णपणे शांततामय व कायदेशीर मार्गाने करण्यात येणार आहे.
सदर आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे-
१) जिल्हा परिषद केंद्र स्तरावरील दि. 2 जानेवारी 2026 शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांची जागा पूर्ण क्षमतेने 100% पदे पवित्र पोर्टल टेट परीक्षा 2025 मधून भरतीच्या पहिल्या टप्प्यात भरण्यात यावीत.
२) स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील दि.15 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये रिक्त होणाऱ्या पदावर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टल टेट 2025 अंतर्गत पूर्ण क्षमतेने भरण्यात यावीत.
३) जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका व नगरपालिका शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शारीरिक शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत.
४) पवित्र पोर्टल TAIT 2025 भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.
सदर बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पासून राज्यभरातील हजारो पात्रता धारक शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक श्री. प्रदुम्न जोशी. श्री .कैलास माने श्री. विश्वनाथ पाटोळे ,श्री. अमोल जोशी ,राज्याध्यक्ष श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव श्री. तायाप्पा शेंडगे व सर्व राज्य कोअर कमिटी सदस्य व श्री.सोमनाथ बलगुडे सांगली जिल्हा अध्यक्ष व सचिव श्री. प्रदीप इचलकरंजे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या