प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम 'ऋतुरंग' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सांस्कृतिक व ऐतिहासिक सादरीकरणाची मेजवानी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हे थीम सादरीकरण. छावा थीमच्या सादरीकरणासाठी तब्बल सहा हजार रुपयांची ड्रेपरी वापरल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारी 'वारी' आणि वारकरी दर्शनाने प्रेक्षक भारावून गेले. शेतकरी गीत, वाघ्या-मुरळी आणि गोंधळ यांसारख्या सांस्कृतिक सादरीकरणातून महाराष्ट्राच्या मातीची परंपरा विद्यार्थ्यांनी हुबेहूब जिवंत केली.
लहानग्यांचे नृत्याविष्कार आणि देशभक्तीचा जागर कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.इयत्ता पहिली आणि दुसरीच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. विशेषतः पहिलीच्या मुलांचे 'पोलिस वाल्या सायकल वाल्या' हे गीत आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी वीर जवानांच्या सन्मानार्थ सादर केलेले 'ओ देश मेरे' हे देशभक्तीपर गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. इयत्ता चौथीच्या मुलींनी 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' ही गवळण, तर पाचवीच्या मुलींनी दाक्षिणात्य गीतांचा तडका देत कार्यक्रमात रंगत भरली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नृत्यदिग्दर्शक विक्रम गुरव आणि अश्विन सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्वप्निल संजय भाट यांनी दर्जेदार स्टेज व संगीत व्यवस्था केली. छायाचित्रण तेजस फोटोचे तेजस व मारुती कोष्टी यांनी केले.
संपूर्ण सोहळ्यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनी आर्थिक सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून उपस्थित पालकांनी आणि गावकऱ्यांनी बक्षिसांची मोठी खैरात केली.
मोहन आण्णा पाटील,काशिनाथ पाटील,आत्माराम तात्या पाटील, व्यवस्थापन अध्यक्ष जगदीश पाटील,ज्ञानेश्वर पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील,मोरया कन्स्ट्रक्शनचे महादेव पाटील,रणदीप पाटील,विष्णू पाटील (फौजी),प्रतापराव उर्फ सूर्यकांत पाटील,गोरख जगताप,प्रशांत घेवारी,मोरया मेडिकल,संजय उर्फ दिलीप पाटील,भारत कदम,किशोर टेकाळे, विश्वास पाटील,सुखदेव जगताप, विक्रम पाटील,विनायक पाटील, डॉ.अजित पाटील,अमोल पवार,अर्जुन पाटील,उदय बुटाले,मनीषा शेंडगे,जालिंदर पाटील,संतोष पाटील,अमोल कोळी,हणमंत पाटील,लक्ष्मण साळुंखे,सुरेश कोरे,बंडू सुतार,अजय पाटील,शिवाजी पाटील,कीर्तीकुमार पाटील,शरद पाटील,प्रकाश खुजट, प्रवीण महाजन,आनंदराव पाटील, जयकुमार पाटील,महेश खुजट, अक्षय घेवारी,भिकुलाल बुटले,सुरेश नायर,चंद्रकांत खुजट,शिवाजी जाधव, तानाजी पाटील,सुरेश साळुंखे,मंगेश लोखंडे,भरत साळुंखे,शिवाजी पवार,तानाजी साळुंखे,संभाजी भोईटे,संपतराव पाटील,भालचंद्र पाटील,आदर्श महिला बचत गट,संभाजी पाटील, किरण कोष्टी,रवींद्र भोईटे,सुरेश निंबाळकर,शोभा मोहिते,नारायण पाटील,धोंडीराम पाटील,भीमराव भोरे,मेघा पवार,धनंजय खराडे,गजानन काटकरभास्कर पाटील,नामदेव माने,आरती पाटील,सुधीर किल्लेदार,आनंदराव काटे,संजय चव्हाण,चंद्रकांत पाटील,शंकर पाटील,चंदना लोखंडे,सिद्धेश्वर भाट,सुरेश शेंडगे,गोरख जगताप, इत्यादी पालक,ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी आर्थिक योगदान दिले.
मुख्याध्यापक वसंत पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील,सलीम मुलाणी,दीपक बोबडे,कलावती कदम,नीता सावंत,ज्योत्स्ना पाटील, सलमा मुल्ला,यास्मिन वलांडकर, ज्योती कापसे,पल्लवी भोसले स्वाती पाटील,प्रियांका पाटील या शिक्षकांनी आर्थिक हातभरासह परिपूर्ण नियोजन केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश पाटील व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे सहकार्य लाभले. उपसरपंच विश्वास आण्णा पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,डॉक्टर अमोल सोनटक्के,काशिनाथ पाटील गुरुजी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सलीम मुलाणी यांनी सर्व देणगीदार, पालक, ग्रामस्थ आणि तंत्रज्ञ यांचे आभार मानले. 'वंदे मातरम'ने या दिमाखदार सोहळ्याची सांगता करण्यात आली. सध्या संपूर्ण परिसरात जि. प. शाळा हातनूरच्या या 'ऋतुरंग 2026' स्नेहसंमेलनाचे भरभरून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या