सांगली: सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या वतीने, तसेच तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल व केपीज चेस अकॅडमी, सांगली यांच्या सहकार्याने सांगली जिल्हा 19 वर्षाखालील मुला व मुलींची स्वतंत्र निवड अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा रविवार, दि. 03 मे 2026 रोजी तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील दि. 01 जानेवारी 2007 नंतर जन्मलेल्या 19 वर्षाखालील मुला-मुलींना सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी रु. 250/- असून, स्पर्धेत मुलांसाठी 4 व मुलींसाठी 7 स्वतंत्र पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत. या ट्रॉफी केपीज चेस अकॅडमी यांनी पुरस्कृत केल्या आहेत. सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धा फी श्री. चंद्रकांत वळवडे (मो. नं. 9975959055) यांच्या गुगल पे क्रमांकावर जमा करून त्याचा स्क्रीनशॉट, तसेच नाव व जन्मतारीख वरील क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतून 19 वर्षाखालील 4 मुलगे व 7 मुलींची निवड करण्यात येणार असून, ते पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धा स्विस साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असून, पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर व राष्ट्रीय पंच शाहरुख कुरणे काम पाहणार आहेत.
अधिक माहितीसाठी सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव श्री. चंद्रकांत वळवडे (मो. नं. 9975959055) यांच्याशी संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या