बुधगाव (वार्ताहर ): येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन विश्वस्त अमित दादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वसंतरावदादा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील] महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर संतोष मोहिते] कॅम्पसचे संचालक डॉक्टर बी एस पाटील व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गणेश लोळगे उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी अनेक ऐतिहासिक दाखले देत विद्यार्थ्यांनी सृजनशीलता विकसित करावी] देशासाठी सशक्त मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आपण आपल्याला अधिक सक्षम बनवावे] असे मौलिक सल्ले दिले. आपल्या अर्धा तासाच्या तडाकेबाज भाषण शैलीमुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. “अशक्य असे शक्य होते ; प्रयत्नांची पराकाष्टा केली गेली पाहिजे“ यावेळी त्यांनी पहाड फोडून रस्ता करणाऱ्या बिहारच्या मांझी यांचे उदाहरण दिले. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून मार्गक्रमण करण्याचा त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. तरुणाईचा उत्साह हा शिगेला पोहोचला होता. यावेळी दर्जेदार नृत्यकला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. शिवतांडव] झांजरिया ] दिल के हाल… अप्सरा आली…या गाण्यांच्या नृत्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक गीत गायनांचे सादरीकरण केले. त्यामध्ये अंजनीच्या सुता… कहो ना कहो…. शिवरायांचा पोवाडा….झिंगाट…. या गाण्यांच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला. प्रेक्षकांनी गाण्याच्या सादरीकरणाला आपल्या नृत्यातून दाब दिली.
यावेळी खवय्यांसाठी अनेक फूड स्टॉल्स विद्यार्थ्यांकडून लावण्यात आले होते . मनोरंजनात्मक खेळांच्या सह संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मंच उपलब्ध झाल्याने सर्व विद्यार्थी खुश दिसत होते. मानवाच्या जीवनात यामुळे संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळेच अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना बहरण्याची] आपले व्यक्तिमत्व अस्त पैलू करण्याची संधी मिळते.
कार्यक्रमाचे सुंदर, नेटके आणि दिमाकदार नियोजन प्राध्यापक चंचल पाटील] प्राध्यापक संदेश आवटी व त्यांच्या संघाने केले . यावेळी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हिरेरीने सर्व उपक्रमात भाग घेतला.
महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. संतोष मोहिते यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंचल पाटील यांनी केले. प्राध्यापिका डॉक्टर स्नेहा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्राध्यापिका अश्विनी लाड] प्राध्यापिका योजना पूदाले
यांनी सांभाळली. आभार प्रदर्शन प्राध्यापक सर्जेराव नरवाडे यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गणेश लोळगे] डॉक्टर बी एस पाटील] डॉक्टर एस एस मोहिते] डॉक्टर के के पांडेजी] कुलसचिव संदीप उमरानी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या