प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पार्टीने आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करत गटनेता,उप गटनेता आणि पक्षप्रतोद पदांच्या निवडी जाहीर केल्या.जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे पार पडलेल्या बैठकीत सुनिल जगन्नाथ जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली.तर उप गटनेतेपदी ऋषिकेश बापूसो बिरणे आणि पक्षप्रतोदपदी प्रमोद शिवाजी शेंडगे यांची निवड करण्यात आली.ही निवड माजी खासदार संजयकाका पाटील आणि युवानेते प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तासगाव पंचायत समितीत तब्बल ३५ वर्षांनंतर सत्तांतर घडवत राष्ट्रवादी (अजित पवार )काँग्रेस पार्टीने सत्ता मिळवली आहे.पंचायत समितीतील १२ सदस्यांपैकी ८ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आल्याने पक्षाने स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाच्या गटनेता, उप गटनेता आणि पक्षप्रतोद पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य उपस्थित होते.नव्या निवडीमुळे पंचायत समितीतील राष्ट्रवादीचा गट अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या