प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये.सांगली जिल्हा अध्यक्षपदी श्री.सोमनाथ बलगुडे यांची व उपाध्यक्ष पदी असिफ मकानदार तर जिल्हा सचिवपदी श्री.प्रदीप इचलकरंजे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया.सांगली जिल्ह्याचे मार्गदर्शक श्री.पद्माकर जगदाळे श्री.जहांगीर तांबोळी श्री. एन.डी.बनसोडे व अमोल जाधव आणि महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
श्री.सोमनाथ बलगुडे यांची सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.आसिफ मकानदार सौ.प्रियांका भगत कार्याध्यक्ष पदी श्री.रोहन सुंगारे सचिवपदी प्रदीप इचलकरंजे सहसचिव पदी श्री.विनायक जोशी व श्री.मुजफ्फर लगीवाले खजिनदारपदी श्री.संदीप पाटील जिल्हा संघटकपदी श्री.सुशांत ठेंगेल,श्री बाळासाहेब माने श्री.जणू हंजगी श्री.अभिजीत पाटील श्री राहुल सरडे यांची निवड झाली आहे. तसेच सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.अण्णासो पाटील सह प्रसिद्धी प्रमुख पदी श्री.अजित माळी, श्री.अजित पाटील यांची निवड करण्यात आली तसेच जिल्हा सदस्य पदी श्री.
वैभव बंडगर श्री.सिद्धेश्वर गळवे सौ. महादेवी घागरे श्री.ओंकार कुंडले श्री.स्वप्नील मोरे श्री.जीवन वंजारी श्री.प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा कार्यकारणी नुकतीच पार पडली.
कार्यकारणीची निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक श्री. पद्माकर जगदाळे
श्री.जहांगीर तांबोळी श्री.एन. डी. पाटील श्री.अमोल जाधव आणि महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगे व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या