प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन गुलाबराव पाटील होमीओपॅथीक कॉलेज व हॉस्पिटल, मिरज येथे महिलांच्यासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन नगरसेविका तथा समाज कल्याण समीती सदस्य सौ. प्राजक्ता सनी धोतरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी प्राजक्ता धोतरे यांनी पृथ्वीराज बाबा पाटील आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट हे कायमच महिलांचा सन्मान करतात. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंब आणि समाज व्यवस्था निरोगी राहते. या विचाराने हॉस्पीटलने आरोग्य शिबीर आयोजित करून महिला उन्नतीसाठी चांगले काम केल्याबद्दल मी महापालिका प्रतिनिधी म्हणुन त्यांचे अभिनंदन करते. महिलांनी कामाच्या व्यापात तब्बेतीची हेळसांड करून नये निरोगी जीवन हे महत्वाचे आहे. असे त्या म्हणाल्या.
यावेळी ट्रस्ट तर्फे महिलांचे आरोग्य प्रबोधन करण्यात आले. या शिबीराचा 74 महिलांनी लाभ घेतला. या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडुन महिलांच्या सर्व आजारांवर मोफत तपासणी व उपचार करून औषधे देण्यात आली.
हा कार्यक्रम संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील, ट्रस्टी ॲड. विरेंद्रसिंह पाटील आणि कॅम्पस को-ऑर्डीनेटर डॉ. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. तहजीन बीडीवाले, डॉ. अनीता नातू, डॉ. वैशाली यादव, महाविद्यालयाती सर्व डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ, इंटर्न विद्यार्थी उपस्थितीत होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या