प्रतिष्ठा न्यूज
कसबे डिग्रज : येथील महावीर स्टेट अकॅडमी, कसबे डिग्रज, सांगली येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील, संस्थेचे सदस्य श्री. नितीनकुमार चौगुले, श्री. अजित फराटे व श्री. सुदर्शन शिरोटे, तसेच माजी सैनिक श्री. सुरेश जाधव व श्री. ज्ञानेश्वर वाकरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच कॉलेजचे प्राचार्य श्री. किरण वाडकर, शाळेचे प्राचार्य श्री. संजय मस्कले, उपप्राचार्या सौ. जयश्री पाटील तसेच समन्वयक सौ. वंदना शिरोटे उपस्थित होत्या.
माजी सैनिक श्री. ज्ञानेश्वर वाकरेकर आणि माजी सैनिक श्री. सुरेश जाधव तसेच संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगताना प्रमुख पाहुणे श्री. सुरेश जाधव यांनी भारतीय संविधान, राष्ट्रप्रेम, देशसेवा व शिस्त याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना NDA (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) विषयी सविस्तर माहिती देताना NDA परीक्षेची तयारी, पात्रता, संधी तसेच सैन्यातील करिअर याबाबत मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी संविधान पालनाचा संकल्प घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या