प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : आसळज जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेसाठी संभाजी पाटणकर व पंचायत समितीसाठी राजेश पाटील यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली असून, काँग्रेसच्या प्रचार दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गगनबावडा येथील उगवाई मंदिरात देवीच्या साक्षीने काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारसंघातील गावोगावी काँग्रेस प्रचाराचा धडाका”
आसळज मतदारसंघात अंदुर, शेनवडे, खोकुरले, आसळज, वेसरफ, पळसंबे, सैतवडे, सांगशी, गगनबावडा, कातळी, नरवेली, ल खमापूर, बोरबेट, बावेली, जर्गी, शेळोशी, खेरिवडे, धुंदवडे, चौधरवाडी आदी गावांचा समावेश असून, प्रचार दौऱ्यादरम्यान सर्वच ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या प्रचार दौऱ्यात डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडू अप्पा पडवळ, मानसिंग पाटील, अजय बोभाटे, दत्ता पाटील
गोकुळचे संचालक बयाजी शेळके,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,
दत्ता वारीक , विशाल पडवळ, रमेश पाटील, महेश पाटील, विलास पाटील, पिंटू पाटील, सुनील चव्हाण, कृष्णात यादव, पांडुरंग कांबळे, अशोक शेटे, मुकुंद पाटील, दीपक घाडगे, बाळू घाडगे, अरुण चव्हाण, पी.जी. वरेकर,गणपती भाम्बुरे, सरपंच मानसी कांबळे, मुस्ताक वडगावे, विजय वरेकर, श्रीकांत वरेकर, चिमाजी खेतल, सुरेश खेडेकर,आदी अनेक मान्यवर व कार्यकर्ते आळीपाळीने सहभागी होत होते.
काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा जागा
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसळज मतदारसंघात प्रचार दौऱ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सर्वच ठिकाणी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लोकांचा कल काँग्रेसकडेच असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवले जात आहे.
अनुभव आणि युवाशक्तीचा संगम
जिल्हा परिषद उमेदवार संभाजी पाटणकर हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. विकासाभिमुख कामकाजाची त्यांची वेगळी ओळख असून ते गगनगिरी महाराजांच्या घराण्यातील आहेत.
तर पंचायत समिती उमेदवार राजेश पाटील हे युवक कार्यकर्ते असून अनेक वर्षांपासून काँग्रेस संघटनेत सक्रिय आहेत. लोकांशी थेट संपर्क, साधी राहणी व कार्यक्षमतेमुळे ते मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत.
यशाचा विश्वास
अनुभव आणि युवाशक्तीच्या जोरावर संभाजी पाटणकर व राजेश पाटील यांना निश्चित यश मिळेल, असा विश्वास मतदारसंघात सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या